टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार व विकेटकीपर अशी महेंद्रसिंग धोनी (M. S. Dhoni) याची ओळख आहे. धोनीने 15 ऑगस्ट 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सध्या धोनी फक्त आयपीएल मध्येच खेळतो. इतर खेळाडूंप्रमाणे धोनी सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. मात्र तब्बल दोन वर्षांनी धोनीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे धोनीचे चाहते देखील हैराण झाले असून त्यांनी धोनीच्या कमबॅकचे जोरदार स्वागत केले आहे.
धक्कदायक! बाप दररोज दारू प्यायचा म्हणून बापाला कंटाळून दोघा मुलांनी जन्मदात्या बापाचीच हत्या केली
दोन वर्षांच्या कालावधीनंतर महेंद्रसिंग धोनीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये धोनीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला वन-डे, टी-20 व चॅम्पियन ट्रॉफी जिंकवून देणारा हा सुप्रसिद्ध खेळाडू या व्हिडीओ मध्ये चक्क शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! कसबा, चिंचवड पोटनिवडणूक रद्द होऊ शकते; कायदेतज्ज्ञांनी केलं मोठं विधान
नवीन काहीतरी शिकून चांगले वाटते असे कॅप्शन धोनीने या व्हिडीओला दिले आहे. याआधी 8 जानेवारी 2021 मध्ये धोनीने इंस्टाग्रामवर पोस्ट ( Instagram Post) केली होती. या पोस्टमध्ये स्ट्रॉबेरीच्या शेतातील व्हिडीओ करण्यात आला आहे. ‘बाजारात जायला स्ट्रॉबेरी राहूच नये यासाठी मी स्ट्रॉबेरीच्या शेतात येतो’ असे कॅप्शन धोनीने या व्हिडीओला दिले होते. महेंद्रसिंग धोनीचे इंस्टाग्रामला 40.5 मिलियन फॉलोवर्स आहेत.