राखी सावंतची ( Rakhi Sawant ) आई सध्या एका गंभीर आजाराचा सामना करत आहे. हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र राखीच्या आईच्या उपचाराचा खर्च फार जास्त आहे. यामुळे तिने मदतीसाठी आव्हान केले होते. या पार्श्वभूमीवर देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी राखीच्या मदतीला धावून आले आहेत. राखीच्या आईच्या उपचारासाठी त्यांनी मदत केली असल्याची माहिती स्वतः राखीने दिली आहे.
“पी दारू..खा गुटखा…”; आरोग्य शिबिराच्या उद्घाटनावेळी अजित पवारांचा मोठा सल्ला!
विरल भयानी यांच्याशी बोलताना राखी सावंतने मुकेश अंबानी यांनी आभार मानले आहेत. यावेळी ती म्हणाली की, “राखीच्या आईला दोन महिन्यांसाठी क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या हॉस्पिटलचा खर्चही जास्त आहे. परंतु, या हॉस्पिटलची फी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्यामुळे कमी करण्यात आली आहे.”
बिग ब्रेकिंग! नरेंद्र मोदींच्या सभेआधी बीकेसीमधील कमान कोसळली
अभिनेत्री राखी सावंत नुकतीच बिगबॉस मराठीच्या ( Bigg Boss) चौथ्या पर्वात दिसली होती. इतकंच नाही तर त्यांच्यातील टॉप 5 फायनलिस्ट पैकी ती एक होती. मात्र शेवटच्या खेळात 9 लाखांची रक्कम घेत राखीने पाचव्या स्थानावर समाधान मानले. दरम्यान बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच राखीने आपल्या आईच्या आजाराबाबत मोठी माहिती दिली होती.