
‘रिलायन्स गृप’ हे भारतातील उद्योग क्षेत्रातील मोठे नाव आहे. विविध सेगमेंट मध्ये त्यांचे व्यवसाय आहेत. सध्या रिलायन्स गृप एका नव्या सेगमेंट मध्ये पाय ठेवण्याच्या तयारीत आहे. हा सेगमेंट म्हणजे साबण ! रिलायन्स गृप आता साबण सेगमेंट मध्ये आपले प्रॉडक्ट्स लाँच करणार आहे. भारतात वेगवेगळ्या कंपनीचे हर तऱ्हेचे साबण बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये मोठी स्पर्धा देखील आहे. अशातच मुकेश अंबानी या व्यवसायात येणार, ही इतर कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
रामदेव बाबा 100 तरुण तरुणींना देणार सन्यास; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?
रिटेल सेक्टर मध्ये रिलायन्स सध्या आघाडीवर आहे. या कंपनीने नुकतेच पीठ, तेल आणि तांदूळ या क्षेत्रात independant ब्रँड आणले आहेत. आता या कंपनीचा डोळा ब्युटी आणि पर्सनल केअर वर आहे. या क्षेत्रातील बाप कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरला रिलायन्स आता टक्कर देणार हे निश्चित आहे. रिलायन्स कन्झ्युमर प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत रिलायन्स आता नवीन ब्रँड लाँच करत आहे.
गूगलवर ‘हे’ नंबर्स कधीच करू नका सर्च, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान
नुकताच त्यांनी ‘Glimmer’ हा नवीन साबण बाजारात आणला आहे. एवढेच नाही तर ‘Get Real’ द्वारे हर्बल नॅचरल सेगमेंट व Puric नावाने अँटीसेप्टिक मार्केटमध्ये रिलायन्सने प्रवेश केला आहे. यामुळे अगामी काळात रिलायन्स मार्केट मध्ये काय धुमाकूळ घालणार हे पाहण्यासारखं असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रिलायन्स सध्याची किरकोळ विक्रीतील देशातील आघाडीची कंपनी आहे.
पहिल्यांदा रडतोय आणि नंतर लगेचच हसतोय, नक्की हा मुलगा आहे तरी कोण? जाणून घ्या त्याच्याबद्दल माहिती