मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे देशातील दिग्गज उद्योजक म्हणून ओळखले जातात. त्याच्याकडे अफाट संपत्ती आहे. त्यांची पत्नी नीता आंबानी यांच्याकडे खूप महागड्या वस्तू असतात. चपलांपासून ते गाड्यांपर्यंत त्या अनेक महागड्या गोष्टी वापरतात. त्यामुळे मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. दरम्यान आता देखील मुकेश अंबानी चर्चेत आले आहेत.
मुकेश अंबानी चर्चेत येण्याचं कारण असं की, नुकतीच श्रीमंतांची यादी जाहीर (List of rich people announced) झाली आहे. या यादीमध्ये मुकेश अंबानी हे प्रथम क्रमांकावर आहेत. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. फोर्ब्सच्या नवीन यादीत मुकेश अंबानी यांनी स्थान पटकावले आहे. मुकेश अंबानी या यादीमध्ये आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरेल आहेत. दरम्यान, अंबानी गेल्या वर्षी या यादीमध्ये 10 व्या क्रमांकावर होते. मात्र सध्या ते पहिल्या क्रमांकावर आले आहेत.
मोठी बातमी! बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना टक्कर देणार ‘ही’ महिला उमेदवार
मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आले असले तरी देखील या यादीत खरी चर्चा झाली ती गौतम अदानी यांचीच, त्यांचा क्रमांक कितवा आहे, याची सर्वांनाच उत्सुकता होती. कारण हिंडनबर्ग (Hindenburg Report) अहवालामुळे अदानी यांच्या साम्राज्याला झटका बसला. त्यामुळे अदानी यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ते सध्या कितव्या क्रमांकावर आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माहितीनुसार, गौतमी अदानी फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलिनिअर्सच्या यादीत 24 व्या क्रमांकाहून थेट 27 व्या क्रमांकावर पोहचले आहेत .