Mukesh Ambani । राजकारणी व्यक्ती, सेलिब्रिटी किंवा मोठमोठे उद्योगपती यांना जीवे मारण्याच्या धमकी देण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. सध्या देखील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
आरोपीने मुकेश अंबानी यांनी धमकीच्या इमेलचे उत्तर न दिल्याने अजून एक धमकीचा ईमेल केला आहे यावेळी आरोपीने जवळपास 200 कोटी रुपयांची मागणी केली आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या धमकीनंतर आता उद्योग विश्वास खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी यांना 27 ऑक्टोबर या दिवशी ई-मेल करत धमकी दिली त्यानंतर तुम्ही २० कोटी रुपये दिले नाही तर तुम्हाला मारून टाकू अशा आशयाची धमकी दिली होती. या धमकीनंतर अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारीने पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला होता.
मात्र यानंतर पुन्हा एकदा काल मुकेश अंबानी यांना धमकीचा ई-मेल आला आहे. यामध्ये तुम्ही माझ्या इमेल ला प्रतिसाद दिला नाही आता रक्कम 200 कोटी द्या अन्यथा मृत्यू वॉरंटवर स्वाक्षरी केलेली आहे. अशा आशयाची दुसरी धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे.