Mumbai Accident News । मुंबईत तीन वाहनांचा अतिशय विचित्र अपघात! ३ जणांचा जागीच मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी

Mumbai Accident News

Mumbai Accident News । सध्या मुंबईतून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या सी लिंकजवळ भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. हा अपघात सी लिंक टोलनाक्यावर झाला आहे.

Sharad Pawar । शरद पवारांच्या वकिलांचे अजित पवार गटावर खळबळजनक आरोप

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला आहे. नाक्यावर उभ्या असलेल्या दोन कारला मागून आलेल्या भरधाव कारने जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. (Mumbai Accident News )

Social Media । महिलेने केस धुण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले; आता केले कोटी रुपयांचे घर खरेदी; जाणून घ्या कसे कमावले पैसे?

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर त्या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने अपघातामधील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आणि तेथील वाहतूक सुरळीत केली. या अपघातामध्ये चालक देखील गंभीर जखमी झाला आहे. चालकासह अन्य चौकांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर एकाला लिलावती रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Devendr Fadanvis । सुषमा अंधारेंनी ट्वीट केलेल्या व्हिडिओवर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Spread the love