Site icon e लोकहित | Marathi News

Mumbai Bomb Blast । मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर? लोकल ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोटाची धमकी

Mumbai again on the radar of terrorists? Serial bomb threat in local train

Mumbai Bomb Blast । मुंबई : मुंबईकरांच्या (Mumbai) चिंतेत भर टाकणारी एक बातमी आहे. कारण पुन्हा एकदा मुंबई दहशतवाद्यांच्या रडारवर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट (Serial Bomb Blast) घडवून आणणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी आता मुंबई पोलीस कसून तपास करत आहेत. (Latest Marathi News)

शिक्षकांना लागणार शिस्त? आता वर्गात नेता येणार नाही फोन

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला एका व्यक्तीने फोनवर माहिती दिली की, मुंबई ट्रेनमध्ये (Mumbai train) सीरियल बॉम्बस्फोट होणार आहे. आपण विलेपार्ले परिसरातून बोलत आहे असा दावा या व्यक्तीने केला आहे. त्यानंतर त्याने आपला फोन बंद केला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागील महिन्यातही मुंबई पोलिसांना असाच धमकीचा फोन आला होता.

Tomato Price । टोमॅटोच्या किमती पुन्हा कोसळणार? येत्या काळात कसे असेल बाजाराचं चित्र, जाणून घ्या

लागेचच मुंबई पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सुरक्षा व्यवस्थेबाबत सतर्क राहण्याची सूचना संबंधित पोलीस ठाण्याला दिल्या आहेत. दरम्यान, पुण्यात देखील एटीएसने बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे.

Weather forecast । नागरिकांनो.. काम असेल तरच बाहेर पडा, ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार मुसळधार

Spread the love
Exit mobile version