Mumbai Airport Video । देशात दिवसेंदिवस महागाई ही वाढतच चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकांचे महिन्याचे आर्थिक बजेट देखील महागाईमुळे कोलमडते. खाद्यपदार्थही खूप महाग होत आहेत. सध्या मुंबई विमानतळाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डोसाची रेट लिस्ट या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आली आहे. (Mumbai Airport Food Rate)
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा शेफ डॉन इंडिया या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की शेफ डोसा बनवताना दिसत आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी लोकांना पाहण्यासाठी रेट लिस्टही दाखवली, ज्यानंतर लोकांना विचार करायला भाग पाडले. व्हिडिओमध्ये ताक असलेल्या मसाला डोसाची किंमत 600 रुपये आहे तर साध्या डोसाची किंमत 620 रुपये आहे. (Mumbai Airport Video)
जर एखाद्या ग्राहकाला डोसासोबत लस्सी किंवा फिल्टर कॉफी प्यायची असेल तर खर्च आणखी वाढत असल्याचे त्या रेट लिस्टमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोअबर या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर अनेक वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.
Girish Mahajan । मराठा आरक्षणाबाबत गिरीश महाजन यांनी केले सर्वात मोठे व्यक्तव्य!