Mumbai boat tragedy । मुंबई बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू, 98 जण जखमी, मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

Mumbai boat tragedy

Mumbai boat tragedy । मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ नीलकमल कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिल्यामुळे भीषण बोट दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात तीन नौदल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 101 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून, 98 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार जणांची स्थिती चिंताजनक आहे. दुर्घटनेत 5 जण अद्याप बेपत्ता आहेत.

Eknath Shinde । ब्रेकिंग! शिंदे गटातील बडा नेता करणार बंडखोरी? धनुष्यबाण हटवला

काल दुपारी 3:55 वाजता घडलेली ही दुर्घटना अरबी समुद्राच्या बुचर आयलंड परिसरात घडली. नंतर तात्काळ बचाव कार्य सुरु करण्यात आले आणि नौदल, कोस्ट गार्ड आणि पोलिसांच्या मदतीने 101 जणांची सुटका केली. मृतांमध्ये 7 पुरुष, 4 महिला आणि 2 बालकांचा समावेश आहे. जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यात जीनपीटी, नेव्ही डॉकयार्ड आणि सेंट जॉर्ज रुग्णालयांचा समावेश आहे.

Sushma Andhare । सर्वात मोठी बातमी! सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी; नागपूर विमानतळावर धक्कादायक घटना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे आणि घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

Eknath Shinde । मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्यांना एकनाथ शिंदें यांनी दिला मोठा सल्ला; म्हणाले…

Spread the love