Mumbai Crime । सध्या प्रेम संबंधातून हत्या होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मुंबईमध्ये तर सर्रास हे प्रकार घडतच आहेत. सध्या देखील नवी मुंबईत एका व्यक्तीने त्याच्या प्रेयसीची लॉजमध्ये हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेयसीचे अन्य व्यक्ती सोबत संबंध असल्याचा संशय प्रियकराला आला होता. त्यामुळे त्याने वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने महिलेला लॉजवर नेले आणि तिची निर्घृणपणे हत्या केली आहे.
हत्या केल्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. माहितीनुसार, नवी मुंबईत एका खाजगी बँकेच्या 35 वर्षे मॅनेजरची तिच्या प्रियकराने गळा दाबून हत्या केली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. (Mumbai Crime)
मुंबई पोलिसांनी आरोपीला त्याच्या घरातून पहाटे अटक केली आहे. यानंतर आरोपीला पोलिसांनी नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. नवी मुंबई पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार झाल्यानंतर आरोपी तरुण उत्तर प्रदेशातील त्याच्या गावी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्याआधीच पोलिसांनी त्याला पकडले.
Sharad Mohol । ब्रेकिंग! गुंड शरद मोहोळ हत्याप्रकरणी आणखी २ आरोपींना अटक; धक्कादायक माहिती समोर