Mahadev Betting App । मोठी बातमी! महादेव बेटिंग अ‍ॅपसंबंधी मुंबई क्राईम ब्रँचकडून पहिली अटक

Mahadev Betting App

Mahadev Betting App । मुंबई : महादेव ॲप (Mahadev App) हे सट्टेबाजीचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म असून येथे अनेकजण ऑनलाईन सट्टेबाजी (Betting App) करतात. त्यामुळे भारतात या ॲपला बंदी घालण्यात आली आहे. भारतात जरी बंदी असली तरी इतर देशांमध्ये हे ॲप अजूनही सुरु आहे. छत्तीसगडमधील चंद्राकर (Chandrakar) आणि त्याचा सहकारी रवी उप्पल (Ravi Uppal) याला दुबईत बसून चालवत होते.

Sharad Mohol । सहा महिन्यांसाठी तडीपार.. मुळशीतील सरपंचाच अपहरण…, शरद मोहोळबद्दल ‘या’ धक्कादायक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

आता याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचला (Mumbai Crime Branch) मोठे यश आले आहे. पोलिसांनी दीक्षित कोठारी (Dixit Kothari) याला अटक केली आहे. गेल्या वर्षी माटूंगा पोलीस स्टेशनमधे एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे हस्तांतरित केले होते. पुढे याप्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. आता पोलिसांनी याप्रकरणी आणखी एक मोठी कारवाई केली आहे.

WTC 2025 । भारतीय संघाला मोठा झटका! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठा बदल

दरम्यान, तपास यंत्रणांना संशय आहे की दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) टोळीने दुबईतून महादेव बुक अॅप इतक्या मोठ्या प्रमाणावर चालवण्यासाठी मदत करण्यात येते. इतकेच नाही तर या प्रकरणी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच यातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर हा दुबईत असून त्याला नजरकैदत ठेवले आहे. चंद्राकर हा याप्रकरणात मास्टर माईंड असल्याचं सांगितले जात आहे.

Christian Oliver Dies । सिनेसृष्टीवर मोठी शोककळा! विमान अपघातात प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याचा २ मुलींसह मृत्यू

Spread the love