Mumbai Crime News । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने (Crime Branch) गोरेगाव परिसरात (Goregaon) चालत असलेल्या सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पर्दाफाश केल्याची माहिती समोर समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. यामधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हे सेक्स रॅकेट एका घरातून चालवण्यात येत होते. (Latest Marathi News)
Saath Nibhana Saathiya । आत्ताची सर्वात मोठी बातमी! ‘साथ निभाना साथिया’ फेम अभिनेत्रीचं निधन
हे सेक्स रॅकेट एक 64 वर्षीय महिला तिच्या घरामधून चालवत होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईमध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगर या ठिकाणी रॅकेट सुरू असल्याचे आढळून आले.
यानंतर पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणी तिघांना अटक देखील केली आहे. या कारवाईत एक 16 वर्षीय मुलगी आणि एका महिलेची सुटका करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोरेगाव मधील निवासी परिसरातील इमारतीमध्ये सेक्स रॅकेट चालवण्यात येत असल्याचे समोर आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.