
अनेकदा राजकीय नेते व विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींनी मोबाईल वरून जीवे मारण्याचा किंवा इतर प्रकारच्या धमक्या येत असतात. मात्र आता थेट महाराष्ट्र पोलिसांना (Maharashtra Police) टॅग करून ट्विटरवर (Twitter) धमकी देण्यात आली आहे. लवकरच मुंबईमध्ये (Mumbai) स्फोट घडवणार असल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे.
धक्कादायक! पत्नीला ९ वेगवेगळ्या पुरुषांसोबत संबंध ठेवायला लावले आणि नंतर…
काल (ता.२२) सकाळी ११ वाजता महाराष्ट्र पोलिसांच्या ट्विटर हँडलला टॅग करत एक धमकीची पोस्ट टाकण्यात आली होती. ‘मी लवकरच मुंबईमध्ये स्फोट घडवणार आहे.’ असे या पोस्टमध्ये लिहिण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया टीमने ही पोस्ट पाहताच संबंधित पोलीस ठाण्याच्या याबाबत माहिती दिली.
लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर सलमान खान सहित होते ‘हे’ १० जण, गँगस्टरचा कबुलीनामा वाचून बसेल धक्का
या पार्श्वभूमीवर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. ज्या ट्विटर हँडल वरून ही पोस्ट टाकण्यात आली त्याचीही कसून चौकशी सुरू आहे. आशा धमक्या सहसा मानसिक दृष्ट्या अवस्थ लोकांकडून येतात. मात्र तरीदेखील पोलीस याबाबत कसून तपास करतात.
भारतासाठी अभिमानाचा क्षण! पुन्हा एकदा नीरज चोप्रा जागतिक भालाफेकपट्टू स्पर्धेत अव्वल
याआधी देखील अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. रविवारी देखील पोलिसांना अशाच धमकीच्या स्वरूपाचा कॉल आला होता.
Bhavya Gandhi | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील टप्पू साकारणार मोठ्या चित्रपटात ‘मोठी’ भूमिका!