Mumbai Fire News । मुंबईतील ग्रँट रोडवरील कामाठीपुरा येथे गुरुवारी रात्री उशिरा एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला. आग इतकी भीषण होती की त्याच्या धुराचे लोट दूरवरून दिसत होते. घटनेची माहित मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी हजर झाल्या. मुंबई अग्निशमन सेवेतील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून इमारतीबाहेर लोकांची गर्दी जमली होती.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) सांगितले की, ग्रँट रोडवरील कामाठीपुरा येथील रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत आतापर्यंत एकाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. बाथरूममध्ये अज्ञात पुरुषाचा जळालेला मृतदेह सापडला आणि त्याला जेजे रुग्णालयात नेण्यात आले. इतर जखमी किंवा बेपत्ता व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
Chandrpur News । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखाची निर्घृण हत्या
आगीमुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून मुंबईत सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. बुधवारी (२४ जानेवारी) गोरेगाव पश्चिमेकडील इमारत आणि राम मंदिर परिसरातील एकमेव इंडस्ट्रियल आग लागल्याची घटना घडली होती.
Maratha Andolan । नवी मुंबईत जरांगे पाटील दाखल, आज मोठा निर्णय होणार?
#WATCH | Mumbai, Maharashtra: A fire broke out at a restaurant in Kamathipura, Grant Road at 2 am. Four fire tenders are on the spot. No injuries reported so far: Mumbai Fire Service pic.twitter.com/Pi2ZhWQTwL
— ANI (@ANI) January 25, 2024