
Mumbai landslide । मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने (Heavy Rain in Maharashtra) धुमाकूळ घातला आहे. अशातच ठिकठिकाणी दरड (Landslide) कोसळल्याच्या घटना समोर येत आहेत. कालच मुंबई-पुणे महामार्गावर दरड कोसळली होती. शिवाय याअगोदर रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड (Irshalwadi landslide) कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. ही घटना ताजी असताना मुंबईतील (Mumbai) अंधेरी पूर्व भागात इमारतीवर दरड कोसळली आहे. (Latest Marathi News)
Havaman Andaj : मोठी बातमी! राज्यभर पावसाचा जोर अजून वाढणार; नेमकं काय आहे कारण?
सततच्या होणाऱ्या पावसामुळे अंधेरी पूर्वमधील चकाला परिसरातील रामबाग सोसायटीमध्ये दरड (Andheri Landslide) कोसळली आहे. मध्यरात्री 2 च्या सुमारास रामबाग सोसायटीमधील काही फ्लॅटवर डोंगराचा काही भाग कोसळला. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
CSK Captaincy । चेन्नईचा भावी कर्णधार कोण? धोनीच्याच जवळच्या व्यक्तीने केला मोठा खुलासा
या घटनेची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने बचाव कार्य सुरु करत नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. परंतु या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत केल्या तीन धडाकेबाज घोषणा; वाचा एका क्लिकवर