Mumbai-Nashik Expressway । आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. यामध्येच नाशिक-मुंबई द्रुतगती महामार्गावरील पाचपाखाडी या ठिकाणी देखील एक भीषण अपघात झाला आहे. ट्रकला मागील बाजूने जीपची जोरदार धडक बसली आहे आणि हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये जीपमधील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
माहितीनुसार, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मुंबईच्या जेजे रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र जीप चालक दारू पिऊन गाडी चालवत असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Rupali Chakankar । “सुप्रियाताई १५ वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या” – रुपाली चाकणकर
एकीकडे नवीन वर्षाचा जल्लोष पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे अपघाताचे सत्र हे सुरूच आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तरुणांच्या जीपचा अपघात झाला आहे. या सदर घटनेमध्ये जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याचे कुटुंबीय देखील देत आहे.