
Mumbai News । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयातून २० दिवसाच्या नवजात बाळाची चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून बाळ चोरी करणाऱ्या महिलेला अटक केल्याची देखील माहिती मिळत आहे.
Corona Update | ब्रेकिंग! क्रिकेट विश्वातून मोठी बातमी! स्टार खेळाडूला झाली कोरोनाची लागण
त्याचबरोबर त्या बाळाला त्याच्या आईकडे सुखरूप सुपूर्द करण्यात आले आहे. मात्र या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. कांदिवली परिसरातील एका महिलेची पश्चिमेकडील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात प्रस्तुती झाली. यावेळी तिला मुलगा झाला मात्र यावेळी तिच्या बाळाचे वजन कमी होते आणि बाळ अशक्त असल्याने त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते.
मात्र यावेळी मालदीव परिसरात राहणाऱ्या एका महिलेने प्रसूती झालेल्या महिलेची दिशाभूल करत तिच्या बाळाची चोरी केल्याची घटना घडली आहे. आरोपी महिला मुलाला घेऊन जातानाची दृश्य रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. यानंतर मुलाच्या पालकांनी कांदिवली पोलीस ठाण्यात मूल चोरी झाल्याची तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात आला. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेच्या आधारे तपास सुरू केला आणि आरोपी महिलेस अटक केली.
मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयातून 20 दिवसांच्या नवजात बाळाची चोरी… pic.twitter.com/bN5x4OGKvN
— Ruchika (@Ruchika66964659) January 12, 2024
Devendra Fadnavis । मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांबाबत भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य