Mumbai News । मुंबई : सध्या सर्वत्र होळीची धामधूम पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी होळी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. मात्र यावेळी अनेक धक्कादायक घटना देखील घडल्या आहेत. सध्या देखील धुलीवंदनाच्या एक धक्कादायक घडली आहे. माहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहेत. समुद्रकिनाऱ्यावर आलेले पाच जण बुडाले असून त्यामधील चार जणांना वाचवण्यात यश आले असून एकाचा शोध सुरू आहे.
Vijay Shivatare । बारामतीत मोठ्या घडामोडी, विजय शिवतारे यांचं सर्वात मोठं विधान
माहितीनुसार, बुडालेले सर्वजण महाविद्यालयातील शिकणारे विद्यार्थी आहेत. यामधील चार जणांना वाचवण्यात यश आले आहे. यामधील दोन जण सुखरूप घरी आहेत तर दोघांवर हिंदूजा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. यामधील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. माहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर हे पाच विद्यार्थिनी नेमके कसे बुडाले याचा शोध देखील घेतला जात आहे.
Baramati Lok Sabha । अजितदादांची धक्कादायक बातमी; शिंदे गटानेही दर्शवला बारामतीत विरोध
सणासुदीच्या दिवसातच ही घटना घडल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर या घटनेमुळे सगळीकडे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या दोन विद्यार्थ्यांवर हिंदुजा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर एका विद्यार्थ्याचा शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे.