Site icon e लोकहित | Marathi News

mumbai pune expressway accident । मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर खाजगी बसचा अपघात, 15 जण जखमी

mumbai pune expressway accident

mumbai pune expressway accident । मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर खोपोलीजवळ शनिवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. कोल्हापूरकडून मुंबईकडे जात असलेल्या खाजगी बसने मुंबई लेनवर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. या अपघातात बसमधील 15 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी 8 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, आय आर बी यंत्रणा आणि आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि जखमींना मदत दिली.

Amit Shah । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शरद पवारांवर जोरदार टीका; म्हणाले, “तुमच्या चार पिढ्या आल्या तरी…”

यात कोल्हापूर येथून फुटबॉल ट्रॉफी जिंकून परतणारी एक टीमही अपघातात अडकली. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या टीममधील चार मुलींना एमजीएम हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. बाकीच्या प्रवाशांना पर्यायी वाहनाने मुंबईत पाठवण्यात आले.

Devendr Fadanvis । ब्रेकिंग! शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा, ‘या’ गोष्टी देणार शेतकऱ्यांना

तसेच, मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटातही एक अपघात झाला आहे. या अपघातामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून परशुराम घाटावर दरड कोसळण्याची समस्या आहे, त्यामुळे महामार्ग प्रशासनाने अजूनही मलबा पूर्णपणे हटवलेला नाही. यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकेरी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.

Ajit Pawar । राज्यात खळबळ! पत्नी सुनेत्रा पवार यांना अटक होण्याचे दिसल्यास अजित पवारांना घाम फुटला; धक्कादायक गौप्यस्फोट

Spread the love
Exit mobile version