Mumbai Rain News । मुसळधार पाऊस मुंबईत सध्या अडचणीचा ठरत आहे. शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे जीवित व वित्तहानी झाली आहे. मुंबईतील ग्रँड रोड परिसरात जीर्ण इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या वरच्या मजल्यावर अनेक लोक अडकले होते. अग्निशमन दल (fire brigade) आणि पोलिसांच्या मदतीने सर्वांची सुटका करण्यात आली आहे.
Samsung Galaxy M35 5G भारतात लॉन्च, चांगल्या कॅमेरासह जाणून घ्या ‘ही’ खास वैशिष्ट्ये
ही घटना शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. रात्रभर पडलेल्या पावसानंतर इमारतीच्या बाल्कनीचा मोठा भाग कोसळला. अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ग्रँड रोड रेल्वे स्टेशनजवळील निवासी भागात बांधलेल्या चार मजली रुबिनिसा मंझिल इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीचा मोठा भाग कोसळून खाली पडला. तेथून जाणाऱ्या काही पादचाऱ्यांना त्याचा फटका बसला. बाल्कनीच्या ढिगाऱ्याखाली दबून एका महिलेचा मृत्यू झाला.
Poltics News । अजित पवारांच्या पक्षाने भाजपपुढे ठेवली मोठी मागणी, निवडणुकीपूर्वीच सुरू केली तयारी!
इमारतीचा ढिगारा पडल्याने परिसरात घबराट पसरली होती. अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. ही घटना जवळच्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ढिगारा खाली पडताना दिसत आहे, अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. लोकांना तातडीने ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आणि जवळच्या भाटिया रुग्णालयात नेण्यात आले. येथे येताच एका महिलेचा मृत्यू झाला. चार जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Sharad Pawar । सर्वात मोठी बातमी! शरद पवारांना निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा