Site icon e लोकहित | Marathi News

Ramdas Athawale: ‘या’ महिन्यात होणार महापालिका निवडणुका, आठवलेंनी सांगितली महत्वाची माहिती

Municipal elections will be held in this month, Athawale told important information

मुंबई : महाराष्ट्र राज्यासह मुंबईतील महापालिका निवडणुकीसाठी (corporation election) सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.पण महत्वाची बाब म्हणजे या निवडणुका कधी होणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.मात्र अशातच रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठं विधान केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

रामदास आठवले म्हणाले की, राज्यातील महापलिका निवडणूक लवकर व्हाव्यात हीच आमची ईच्छा आहे.पण ठाकरे सरकारनं (Thakarey government)प्रभाग बदलले आणि सगळा गोंधळ झाला. त्यामूळे निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.आज बालगंधर्व रंगमंदिरात रिपाइंचा मेळाव्यात रामदास आठवले यांनी डिसेंबर अखेरपर्यंत राज्यातील महापालिकेच्या निवडणुका होतील, अशी शक्यता वर्तवली आहे. पुढे ते म्हणाले की, आम्ही एकनाथ शिंदे गट (Shinde group)आणि भाजपसोबत(BJP) युती करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढणार आहोत.

NDA/NA II परीक्षेची तयारी करताय? तर जाणून घ्या ‘हे’ नवे नियम

आता केवळ वनविभागाताच होणार ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’, पण…

आमचं सरकार पडणार नाही

पुढे रामदास आठवले म्हणाले,आम्हाला अधिक जागा मिळाव्या आणि सत्तेत देखील वाटा मिळावा यासाठी मी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. विरोधक आमचं सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र तुम्ही काही केलं तरी आमचं सरकार पडणार नाही,अस देखील रामदास आठवले म्हणाले.

Raj Thackeray: राज ठाकरेंना औरंगाबाद पोलिसांची नोटीस, सभेवेळी अटींचा भंग केल्याचा आरोप

खेळत बसा तुम्ही एक्के, आम्ही आहोत पक्के

रामदास आठवले यांनी विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून रोज होणाऱ्या नव्या घोषणांवर कवितेच्या चार ओळी ऐकवल्या. “50 खोके, एकदम ओके, खेळत बसा तुम्ही एक्के, आम्ही आहोत पक्के” अशा कवितेच्या चारओळी आठवले यांनी ऐकवल्या.

Spread the love
Exit mobile version