आपल्या आजूबाजूला अनेक ठिकाणी विवाहबाह्य संबंधांतून ( Extramarital affairs) चुकीच्या घटना घडत असतात. केरळमध्ये एका व्यक्तीने आपले विवाहबाह्य संबंध लपविण्यासाठी महिलेचा खून केल्याचे उघड झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या व्यक्तीने मैत्रिणीला कसे मारायचे व मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे गूगलवर सर्च ( Google Search) केले. यामुळेच हे प्रकरण उघडकीस आले आहे.
केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील प्रशांत नांबियार या ३३ वर्षीय तरुणाने त्याच्या मैत्रिणीचा खून केला आहे. सुचित्रा पिल्लई असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सुचित्रा व प्रशांत या दोघांचे विवाहबाह्य संबंध होते. सुचित्रा ही प्रशांतच्या पत्नीची नातेवाईक होती. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
सुचित्राचा दोनदा घटस्फोट (Divorse) झाल्याने तिला लग्न करण्यात रस न्हवता. मात्र तिला स्वतःचे मूल हवे होते. तिने मुलासाठी प्रशांतच्या मागे तगादा लावला होता. मात्र मुलासाठी होकार दिल्यास आपले अफेअर उघडकीस येईल. या भीतीने प्रशांतने सुचित्राचा खून केला.
सुचित्राचा खून केल्यानंतर मृतदेहाची (Deadbody) विल्हेवाट लावण्यासाठी प्रशांतने त्याचे तुकडे केले. त्यानंतर घराच्या मागे खड्डा करून त्यात अवयवांची विल्हेवाट लावली. विशेष बाब म्हणजे त्याने पेट्रोल शिंपडून तिच्या वस्तूंचे अवशेष जाळण्याचा देखील प्रयत्न केला. हे प्रकरण जवळपास ३ वर्षांपूर्वीचे आहे. मात्र यातील मुख्य आरोपी प्रशांतला आता न्यायालयाकडून शिक्षा मिळाली आहे.
Prithvi shaw ने हाफ सेंच्युरी ठोकल्यावर नाशिकच्या मुलीने केले गजब सेलिब्रेशन, तिने पृथ्वीसाठी खास….