Site icon e लोकहित | Marathi News

चोरी करताना पाहिले म्हणून महिलेची हत्या; धारधार हत्याराने वार करून विहरीत ढकलून दिले…

Murder of a woman for being seen stealing; Stabbed with a sharp weapon and pushed into a well…

पुणे (Pune) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने चोरी करताना पाहिल्याने तिचा धारधार हत्याराने खून करण्यात आला आहे. इतकंच नाही तर हत्या करून महिलेचा मृतदेह विहरीत टाकून देण्यात आला आहे. दरम्यान अवघ्या दोन दिवसांत प्रकरणाचा तपास करून हडपसर पोलिसांनी संबंधित गुन्हेगाराला अटक केले आहे.

जगातील सर्वात महाग ट्रॅक्टर बद्दल तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या अधिक..

चार दिवसांपूर्वी (ता. २४) दुपारी आरोपी मांजरी बुद्रुक येथील एका विहरीजवळील जुनी मोटार चोरी करण्यासाठी गेला होता. ही मोटार चोरी ( Robbery) करत असताना एका महिलेने त्याला पाहिले. ती महिला चोरी बाबत पोलिसांना सांगेल आणि आपल्याला शिक्षा होईल या भीतीने आरोपीने महिलेचा खून केला. (Crime case)

“…मग बहीण-भावाच्या शारीरिक संबंधाना मान्यता देण्याच्या याचिका येतील”, समलैंगिक संबंधांवर सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

या आरोपीचे नाव राजेश मुळेकर असे आहे. राजेशने चोरी करताना महिलेने पाहिले म्हणून सुरवातीला तिच्या डोक्यात वीट घातली. त्यानंतर कोयत्याने वार करत तिचा खून केला. आपला गुन्हा लपवण्यासाठी त्याने महिलेचा मृतदेह विहरीत टाकला.

Gautami Patil: बैलासमोर लचकत मुरडत नाचली गौतमी! कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश मुळेकर चार ते पाच दिवसांपूर्वीच कारागृहातून सुटला होता. या प्रकरणी राजेशवर संशय आल्यानंतर चौकशी केली असता तो गायब झाल्याचे समजले. यानंतर हडपसर पोलिसांनी अधिक तपास घेत राजेश मुळेकरला जेरबंद केले.

अतिक अहमदकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती! कोण होणार या मालमत्तेचा वारस?

Spread the love
Exit mobile version