
सातारा (Satara) येथे एकाच घरात चौघांचे मृतदेह आढळले आहे त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या चौघांनी आत्महत्या (Suicide) की हत्या केली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मृतांमध्ये आई-वडील आणि दोन मुलांचा समावेश आहे. या घटनेचे कारण अजूनही अस्पष्ट असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून (Satara Police) सुरु आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यामधील पाटण (Patan) तालुक्यातील संणबुर येथील एक शेतकरी कुटुंब रात्री हे एकत्र झोपले होते. परंतु सकाळी झाली तरीही घरातून कोणीच बाहेर न आल्याने ग्रामस्थांना संशय आला. त्यांनी घराचा दरवाजा उघडला असता त्यांना हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आनंद जाधव, सुनंदा जाधव मुलगा संतोष जाधव आणि विवाहीत मुलगी पुष्पलता धस अशी मृतांची नावे आहे.
दिलासादायक बातमी! १५ ऑगस्टपर्यंत मिळणार सरसकट कांदा अनुदान
ग्रामस्थांनी याची माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हे चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
धक्कादायक! खालापूर दरड दुर्घटनेतील मृतांमध्ये भवर आणि पारधी कुटुंबातील सर्वाधिक सदस्य