Site icon e लोकहित | Marathi News

Murder | प्रेयसीच्या छातीत, पोटात चाकूने वार केले… शरीराचे तुकडे केले आणि त्यानंतर केलेले कृत्य वाचून तुमच्याही अंगावर येईल काटा!

Murder | The girlfriend was stabbed in the chest, stomach… the body was cut into pieces and after reading what was done, you will also get goosebumps!

हैदराबाद (Haidarabad) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीमधील श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती याठिकाणी झालेली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या सोबत लिव्ह इन (Live in relationship) मध्ये राहणाऱ्या पार्टनरची हत्या करून दगड कापण्याच्या मशीनने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आहेत. त्यानंतर हे तुकडे शहरातील भागात टाकून दिले आहेत तर मृताचे हात आणि पाय घरात रेफ्रिजरेटर मध्ये ठेवले होते.

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलताना वयोवृद्ध आजोबा जमिनीवर कोसळले अन् त्यानंतर…

१७ मे ला एका सफाई कर्मचाऱ्याला कचराकुंडीत छिन्नविछिन्न अवस्थेतील मुंडके मिळाले. याबाबत त्याने पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी केलेल्या तपासात हे प्रकरण उघडकीस आले आहे. आरोपी चंद्र मोहन व कृतिका याराम अनुराधा यांचे मागील १५ वर्षांपासूनचे प्रेम संबंध होते. हे दोघेही चैतन्यपूरी कॉलनी, दिलसुखनगर येथे राहत होते.

मान्सून संदर्भात समोर आली सर्वात मोठी अपडेट! हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

दरम्यान कृतिका २०१८ पासून व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय करत होती. चंद्र मोहनने देखील ऑनलाइन व्यवसाय करण्यासाठी तिच्याकडून ७ लाख रुपये घेतले होते. याच पैशांवरून कृतिका आणि चंद्र मोहन यांच्यात वाद झाले. यावेळी रागात येऊन चंद्र मोहनने कृतिकाच्या छातीवर आणि पोटावर वार करत तिची हत्या केली.

Big Breaking | ठाकरे गट पुन्हा एकदा फुटणार! शिंदे गटाच्या मोठ्या नेत्याने केला दावा

हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने दगड कापण्याच्या मशिनने मृतदेह कापला. मृताचे धड बाजूला करून पॉलिथीनच्या पिशवीत ठेवले व हात आणि पाय घरात रेफ्रिजरेटर मध्ये ठेवले. एवढंच नाही तर मृत अवयवांचा वास येऊ नये म्हणून आरोपी फिनाइल, डेटॉल, अत्तर, अगरबत्ती आणि कापूर अवयवांच्या तुकड्यांवर शिंपडत होता. यासाठी त्याने ऑनलाइन व्हिडीओ देखील पाहिले होते.

प्रियांका चोप्राने दिग्दर्शकाबाबत केला धक्कादायक खुलासा; म्हणाली…

Spread the love
Exit mobile version