
दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाने सगळं देश हादरून गेला होता. त्यांनतर त्याच घटनेसारख्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा श्रद्धा वलकर हत्याकांडासारखं हत्याकांड मीरारोडमध्ये घडलं आहे. (A man living in a live-in relationship brutally murdered his girlfriend in Mira Road)
मीरा रोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने त्याच्या प्रियसीला जीवे मारले त्यांनतर तिच्या शरीराचे काही भाग घरात ठेवले आणि काही भाग बाहेर टाकले. घरात मृतदेहाचे तुकडे असल्याने त्याची दुर्गंधी शेजारच्यांनी येऊ लागली त्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे. आता यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे ट्विट करत म्हणाल्या, “मुंबई येथील मीरा रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन् पार्टनरची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून व मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय भीषण, अमानुष आणि संतापजनक आहे. गुन्हेगारांना या राज्यात कायद्याचा धाक शिल्लक राहिलाच नाही अशी ही स्थिती आहे. महिलांवरील गुन्हे संतापजनक पद्धतीने वाढत आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या खात्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकरणातील आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी तपासयंत्रणांनी प्रयत्न करावे.” असे संतप्त ट्विट त्यांनी केले आहे.
धक्कादायक! अल्पवयीन भाच्याने मामीला केले ब्लॅकमेल; मामीने उचलले थेट टोकाचे पाऊल