“मुरजी काकांचे आमच्यावर खूप उपकार..”, टाईमपास’फेम दगडूचे भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत वक्तव्य

"Murji Kaka is very kind to us..", Timepass' fame Dagdu's statement at BJP's Murji Patel's rally

मुंबई : सध्याच्या परिस्थितीत राज्यभरात अंधेरी पुर्वची निवडणूक (Andheri East Election) चर्चेचा विषय ठरली आहे. ही पोटनिवडणूक शिवसेना आमदार रमेश लटके (MLA Ramesh Latke) यांच्या निधनामुळे होणार आहे. दरम्यान यासाठी ठाकरे गटाकडून (Thackreay group) रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच याच निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे मैदानात आहेत. दरम्यान याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शिंदे गट (Shinde group) एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत.

“नोकरी नाही मिळाली म्हणून…”, बी कॉम इडलीवाल्याची प्रेरणादायक कथा; वाचा सविस्तर

महत्वाची बाब म्हणजे जेव्हा शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर अंधेरी पुर्वच्या पोटनिवडणूकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेतले आहे. तसेच त्यांनी आपले चिन्ह मशाल घेतले आहे. दरम्यान दुसरीकडे शिंदे गटाने पक्षाचे नाव बाळासाहेबांची शिवसेना असे घेतले आहे. तर चिन्ह हे ढाल आणि तलवार असे घेतले आहे.

भाजीपाला उत्पादकांसाठी दिलासादायक! वाटाणा, शेवग्याचे भाव तेजीत, सविस्तर जाणून घ्या दर

भाजपचे मुरजी पटेल (Murji Patel) यांनी आज आपला निवडणुकीसाठीचा अर्ज भरला. महत्वाची बाब पहिली तर मुरजी पटेल यांच्या या शक्तीप्रदर्शनात मराठी अभिनेता प्रथमेश परबही (Actor Prathamesh Parab) उपस्थित होता. इतकंच नाही तर प्रथमेशने या शक्तीप्रदर्शनात बोलताना राजकीय विषयांना हात घातला आहे. सध्या प्रथमेशच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Cricket: चक्क ‘या’ क्रिकेटपटूंच्या प्रेमापोटी घेतला मित्राचा जीव, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शक्तीप्रदर्शनात बोलताना प्रथमेश म्हणाला की, “मुरजी काका फक्त माझेच नाही तर या संपूर्ण विभागाचे काका आहेत. मुरजी काका फक्त माझाच नाही तर सर्वसामान्यांनीही त्यांना फोन केला तर ते नेहमीच उचलतात. मुरजी काकांचे आमच्यावर खूप उपकार आहेत कारण जेव्हा मी चाळीत रहायचो तेव्हा तिथे पाणी नीट येतंय की नाही ते मुरजी काका आवर्जुन पाहायचे. दरम्यान काल रात्री मला मुरजी काकांचा फोन आला होता. त्यांनी मला आज मिरवणुकीत येणार का विचारलं. आणि मी लगेच तयार झालो. कारण या विभागात विचार करणारी माणसं खूप आहेत” अस प्रथमेशने शक्तीप्रदर्शनात बोलताना सांगितलं.

शेतकऱ्यांची कमाल! ‘या’ जिल्ह्यात तरुणांनी गटशेतीतून घेतले तब्बल 10 हजार क्विंटल बटाट्याचे उत्पादन

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *