Murlidhar Mohol । पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी (२४ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मराठी भाषेत लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. खुद्द खासदार मोहोळ यांनी याबाबतचा व्हिडिओ ‘एक्स’वर शेअर केला आहे. त्यांच्या शपथविधीचा व्हिडिओ शेअर करताना भाजप नेत्याने सांगितले की, त्यांनी मातृभाषा मराठीतून शपथ घेतली.
महाराष्ट्रात भाजपने लोकसभेच्या एकूण 9 जागा जिंकल्या. यापैकी एक जागा पुण्याचीही आहे. ही जागा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जात होती, मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला. मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांचा 1 लाख 23 हजार 38 मतांनी मोठ्या फरकाने पराभव केला.
महाराष्ट्राच्या खासदारांनी मराठीतून शपथ घेतली
लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी सोमवारी शपथ घेतली तेव्हा भारतातील भाषिक वैविध्यतेची झलक पाहायला मिळाली. बहुतांश सदस्यांनी हिंदीतून तर महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी मराठीतून शपथ घेतली. मोदी मंत्रिमंडळात पुण्याचे भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार राज्यमंत्री आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आली आहे.
खासदारकीची शपथ मायमराठीत…
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 24, 2024
१८ व्या लोकसभेचा सदस्य म्हणून आज मायमराठीत शपथ घेतली. पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकसित आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कटिबद्ध राहू !
@narendramodi #MP #Pune #खासदार #पुणे pic.twitter.com/kduZAYzxGC
Accident News । पुण्यात मोठा अपघात, प्रवाशांनी भरलेली बस झाडावर आदळली; 25 जण जखमी