Site icon e लोकहित | Marathi News

मशरूम ची शेती म्हणजे मालामाल कार्यक्रम ! होतो लाखो रुपयांचा फायदा

Mushroom Farming

आजकाल लोकांचा कल आधुनिक शेतीकडे वाढत आहे. यामध्ये विविध फळबागांची लागवड व शेतीचे इतर प्रयोग केले जात आहेत. बाजारात वाढती मागणी असल्याने मशरूम लागवड (Mushroom Farming) देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मशरूम फार्मिंग साठी मोठ्या गुंतवणूकीची गरज नसते. यातून लाखो रुपये कमावता येतात. छोट्या जागेत देखील हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.

म्हणून रितेश आईला एकेरी हाक मारतो ; रितेशचा हा खुलासा वाचून तुम्हीही व्हाल थक्क !

मशरूम उत्पादनाकरीता बंदिस्त स्वरुपाची जागा लागते. याची शेती करण्यासाठी झोपडी, बांबू हाऊस, मातीचे घर यांचा प्रामुख्याने वापर होतो. तसेच मशरूम उत्पादनासाठी पाणी स्वच्छ व शुद्ध लागते. मशरूमच्या बिजाणूंची वाढ करण्यासाठी गव्हाच्या दाण्याचा ( Wheat seed) उपयोग केला जातो.

गौतमी पाटीलचा येणार चित्रपट; या अभिनेत्या सोबत असणार मुख्य भूमिकेत

अंधारमय वातावरणात ही शेती केली जाते. वातावरणात आद्रता ७० ते ८०% , तापमान १८ ते २८ अंश सेल्सियस असावे. मशरूमच्या उत्तम उत्पादनाकरीता खेळती हवा असणे ही एक महत्वाची बाब आहे. मशरूमची शेती करत असताना कच्चा माल भिजवण्यासाठी ड्रम लागतो. पाणी गरम करण्यासाठी हिटर, वातावरण नियंत्रित करण्यासाठी भट्टी, आळंबी वाळविण्यासाठी ड्रायर व तापमानाची नोंद ठेवण्यासाठी तापमान मोजणी लागते.

विराट कोहली आणि रोहित शर्मा वर्ल्डकप जिंकवून देणार नाहीत ; कपिल देव यांचे गंभीर विधान

Spread the love
Exit mobile version