Vishal Bribe Case । दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा (Southern cinema) लोकप्रिय अभिनेता विशाल (Vishal) हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतो. तो सोशल मीडियावरही (Social media) सक्रिय असतो. त्याचे लाखो चाहते आहेत. सध्या तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे तक्रार करत या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. (Latest Marathi News)
नुकताच लाँच झालेला ‘मार्क अँटनी’ या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन मंजूर करण्यासाठी आपल्याला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनला (Central Board of Film Certification) 6.5 लाख रुपयांची लाच द्यावी लागली, गंभीर आरोप केला आहे. त्याने याबाबत ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्याने धाव घेतली आहे.
Health Tips । 15 दिवस खाऊ नका भात, तुम्हाला जाणवतील आश्चर्यकारक बदल
“आम्ही प्रमाणपत्रासाठी सेन्सॉर बोर्डाकडे अर्ज केला. परंतु चित्रपटाला मंजुरी नाकारली. मॅनेजरला अधिकाऱ्यांनी 6.5 लाखांची मागणी केली. मी त्यांना ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केले. आमच्या मेहनतीची ही कमाई होती जी लाचखोरीत वाया गेली,” असे धक्कादायक आरोप विशालने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये केले आहे.
Nanded News । धक्कादायक! पाण्याचा अंदाज न आल्याने दोन सख्ख्या भावंडांसह तिघांचा बुडून मृत्यू
पुढे तो म्हणाला, “मी हा प्रश्न महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून देत आहे. माझा कष्टाचा पैसा भ्रष्टाचारात वाया गेला असून मला तुमच्याकडून आशा आहे की नेहमीप्रमाणे सत्याचा विजय होईल,” असे विशाल म्हणाला आहे.
Health Tips । सावधान! अंड्यासोबत काय खावं आणि काय खाऊ नये? वेळेपूर्वीच जाणून घ्या, नाहीतर..