नाशिक: नाशिक जिल्ह्याला कांद्याची पंढरी (Onion) म्हणून ओळखले जाते. दरम्यान सध्याच्या परिस्थितीत नाशिक जिल्ह्यात (Nashik) साठवणूक केलेल्या कांद्याला फटका बसू लागला आहे. सरकारी संस्था असलेल्या नाफेडला (Nafed) देखील याचा मोठा फटका बसला आहे.यंदा अडीच लाख मॅट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात आली होती.कांद्याच्या बाजारभावात (market price) वाढ झाल्यास ग्राहकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी नाफेड कडून खरेदी करत कांदा साठवून ठेवला जातो.
नोकरी शोधनाऱ्यांसाठी खुशखबर! ‘ही’ कंपनी करणार 9000 जागांची मेगाभरती
परंतु कांद्याचे दर स्थिरावले असल्याने याचा फटका नाफेडला बसला आहे. पाच महिन्यांपूर्वी नाफेडच्या गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेला कांदा बाहेर काढण्यास सुरुवात झाली आहे. या गोडाऊनमधील 2 हजार मॅट्रिक टन कांदा बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. हा कांदा 15 दिवसात देशातील विविध भागांमध्ये पाठवण्यात आला आहे. दरम्यान हा कांदा काढताना यात मोठ्या प्रमाणात कांद्यातून काळपट पाणी ही बाहेर पडतानाचे चित्र दिसून आले आहे.
अरे बापरे! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस उलटली, पाहा नेमकं काय आहे प्रकरण?
मात्र, किती टक्के कांदा खराब झाला आहे हे सध्या स्पष्ट नसले तरी याबाबत लवकरच स्पष्ट होईल. पावसाळ्यात झालेल्या मुसळधार पावसाने वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे, अचानक झालेल्या या बदलामुळे साठवून ठेवलेल्या कांदा सडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी देखील कांदा साठवून ठेवला असल्याने त्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
CNG आणि PNG च्या किमती 1 ऑक्टोबरपासून वाढणार? आतापर्यंतचा सर्वोच्च दर असणार