Nagar-Kalyan Highway Accident । सध्या अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. कल्याण नगर महामार्गावर एसटी बस, ट्रॅक्टर आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आणि त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. सध्या अपघातग्रस्तांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी बस, उसाचा ट्रॅक्टर आणि कार यांच्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील ढवळापुर फाट्यानजीक भीषण अपघात झाला. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीनही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.