Nagpur Factory Blast News । नागपूरमध्ये (Nagpur) एका कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात ९ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही कंपनी दारुगोळा सप्लाय करते. कंपनीत (Solar Explosive Company in Bazargaon) सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दारूगोळा बनवण्याचे काम चालू असताना घटना घडली आहे. (Latest Marathi News) या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं.
Nagpur Blast । दारुगोळा सप्लाय करणाऱ्या कंपनीत स्फोट, ९ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू
त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. बचावकार्यासाठी राज्य आपत्ती विभाग पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे.
पहा फडणवीसांचे ट्विट
“नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे.संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे. नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून स्वतः IG, SP, जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मान्यता दिली आहे. असे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 17, 2023
संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी…
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील सोलार एक्सप्लोरी कंपनीत (Solar Explosive Company) स्फोट झाला आहे. नऊच्या दरम्यान झालेल्या स्फोटामध्ये दुर्घटना झाली आहे. या कंपनीत दारूगोळा बनवण्याचे काम सुरू होते. संरक्षण क्षेत्राशी निगडीत काही कंपन्यांना ही कंपनी दारूगोळा सप्लाय करते. एक्सप्लोसिव्हमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर होतो.
Pune Crime । धक्कादायक! शारीरिक संबंधास नकार दिल्याने डोक्यात घातला रॉड, महिलेचा जागीच मृत्यू
नागपूरमधील बाजारगाव येथे ही कंपनी आहे. कंपनीत दारुगोळा बनवण्याचे काम सुरु असताना स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये ९ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. याबाबत नागपूरचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास नागपूर पोलीस करत आहेत.
Libya । भीषण दुर्घटना! स्थलांतरितांना नेणारं जहाज बुडालं, 61 जणांचा मृत्यू