
Nagpur Firing News । सध्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे. दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटना वाढत आहेत. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या देखील नागपूरमधून गोळीबाराची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूर मध्ये एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
Raj Thackeray । राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “आज त्यांना…”
या गोळीबाराच्या घटनेने नागपूर हादरून गेले आहे. नागपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून या प्रकरणाचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे. नागपूर या ठिकाणी एकाची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ज्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या झाली तो व्यक्ती जुना प्रेस फोटोग्राफर असल्याची माहिती मिळत आहे. या व्यक्तीला काम सोडून अनेक वर्ष झाली आहेत. मात्र सध्या त्याची हत्या झाल्याने नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिकचा तपास आता पोलिस यंत्रणा करत आहे.
Manoj Jarange Patil । ब्रेकिंग न्यूज! मनोज जरांगे पाटील यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा झटका