मराठी चित्रपटसृष्टीत सिनेमाची व्याख्या बदलून टाकणाऱ्या काही मोजक्या दिग्दर्शकांमध्ये नागराज मंजुळे ( Nagraj Manjule) टॉप ला आहे. सैराट, फँड्री, झुंड यांसारखे ‘एक से बडकर एक’ त्यांनी तयार केले आहेत. दरम्यान नागराज मंजुळे यांचा घर बंदूक बिर्याणी हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहेत. यामधील त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. अशातच नागराज मंजुळे यांनी नुकतीच एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ( New Movie)
अरेरे! राखी सावंतने केली हद्दपार; थेट टाॅप न घातलताच कारमधून उतरली अन् व्हिडीओ झाला व्हायरल
महत्त्वाची बाब म्हणजे नागराज मंजुळे यांचा हा नवीन चित्रपट जिओ स्टुडिओ ( Jio Studio) सोबत असणार आहे. नुकताच जिओ स्टुडिओचा इन्फिनाईट टुगेदर हा सोहळा पार पडला. यामध्ये जिओ स्टुडिओची निर्मिती असणाऱ्या अगामी १०० चित्रपटांची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात नागराज मंजुळे यांनी आपल्या अगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट एका महान खेळाडूच्या आयुष्यावर असणार आहे.
“…अन् बैलांना आपल्यासमोर जीव सोडताना पाहून शेतकरी ढसाढसा रडला”
सुप्रसिद्ध कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे नाव देखील ‘खाशाबा’ असे असणार आहे. ” या चित्रपटात कोणते कलाकार असणार आहेत? व चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे? याबाबत लवकरच सांगितले जाईल. तसेच हा चित्रपट उत्तम होईल व प्रेक्षकांना सुद्धा आवडेल.” असे नागराज मंजुळे म्हणाले आहेत.
सुप्रिया सुळे मुंबईकरांना म्हणाल्या, “नुसतं घड्याळ बघू नका, तर घड्याळाचं…”