सैराट, फँड्री, नाळ आणि झुंडच्या यशानंतर प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक नागराज मंजुळे यांचा घर बंदूक बिर्याणी हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात आकाश ठोसर, सयाजी शिंदे, सायली पाटील हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. येत्या 7 एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
मोठी बातमी! ‘आई कुठे काय करते’ फेम गौरीचा मोठा अपघात
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नागराज मंजुळे, आकाश ठोसर, सयाजी शिंदे, सायली पाटील हे महाराष्ट्र्भर दौरा करत आहे. यानिमित्ताने अनेक ठिकाणी बोलताना नागराज मंजुळे यांनी सैराट, फॅन्ड्री, झुंड या चित्रपटांच्या काही आठवणी देखील शेअर केल्या आहेत. नागराज मंजुळे यांचा सैराट चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटामध्ये आकाश ठोसर, रिंकू राजगुरू या दोघांनी परश्या आणि आर्चीची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या चित्रपटातील अर्चिच्या काही डायलॉगने तर लोकांना वेड लावले होते.
आता अर्चिच्या भूमिकेबाबत मंजुळे यांनी मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले, “आर्चीच्या भूमिकेसाठी सायली पाटीलची निवड करण्यात आली होती. यासाठी ऑडिशन घेतली होती. चार पाच वेळा सायलीची ऑडिशन झाली. यांनतर सायलीची निवड देखील झाली मात्र यावेळी सायलीनेच या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. त्यावेळी अभिनय करण्यासाठी सायली इतकी उत्सुक नव्हती. त्यामुळे सायलीने सैराट साठी काम केलं नाही.