सैराट (Sairat)चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagaraj Manjule) यांनी ‘झुंड’ हा हिंदी चित्रपट केला. या चित्रपटाला पाहिजे तितका प्रतिसाद मिळाला नाही. आता नागराज मंजुळे पुन्हा एकदा आगळावेगळा प्रयोग घेऊन आपल्यासाठी आले आहेत. गेल्याच वर्षी नागराज मंजुळे यांनी झी स्टुडिओनी एका चित्रपटाची घोषणा केली होती. ‘घर बंदूक बिरयानी’(Ghar Banduk Biryani) चित्रपट आता ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
गौतमी पाटीलच्या समर्थनार्थ कलाकार रस्त्यावर उतरणार! आरोपीला लवकरात
‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटातील ‘गुन गुन’ या हळुवार प्रेम फुलवणाऱ्या गाण्याने अनेक चाहत्यांची मन जिंकली आहेत. मराठीत आशिष कुलकर्णी आणि कविता राम यांनी हे गाणं गायलं असून वैभव देशमुख यांचे या गाण्याला बोल लाभले आहेत. हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सध्या या गाण्याचं ट्रेंड आल्याच पहायला मिळत आहे. अनेक जोडपी हे गाणं प्रि- वेडिंगसाठी वापरत आहेत. हे गाणं मराठी,तेलुगु आणि तामिळ भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
मुलांनी हॉलिवूडचे चित्रपट पाहिले तर पालकांना कारागृहात डांबून ठेवण्यात
सोशल मीडियावर या गाण्याला ३ मिलियनहूनही अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. हे गाणं आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याविषयी बोलताना संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र म्हणतात की, हे गाणं मराठी तेलुगु आणि तामिळ भाषेत ऐकायला खूप श्रवणीय वाटतं. एकच गाणं विविध भाषेत करताना खूप मजा आली. मुळात गाण्याची चाल सारखीच असुन भावनाही तितक्याच हृदयस्पर्शीय आहे. मला खात्री आहे की, मराठीसह दक्षिण्यात संगीतकारही या गाण्यावर मनापासून प्रेम करतील.यादरम्यान सर्वांचे लक्ष चित्रपटांकडे वेधले आहे.
एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हायरल