राजकीय वर्तुळात रोज ट्विस्ट आणणाऱ्या घडामोडी घडत आहेत. अशातच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र यामधून विरोधी पक्षनेते अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Ajit Pawar & Sunetra Pawar) यांचे नावच गायब झाले आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत. 2021 मध्ये ईडीने या बँक घोटाळ्याप्रकरणी जरंडेश्वर साखर कारखान्याची कोटींची मालमत्ता जप्त केली होती.
मानसिक तणावातून विद्यार्थिनीची हॉस्टेलमध्ये आत्महत्या; सुसाईड नोट मध्ये लिहिले की…
अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित कंपनीच्या विरोधातील हे आरोपपत्र असून यामधून या पवार दाम्पत्याचे नाव काढून टाकले गेले आहे. ईडीने आता अजित पवारांशी संबंधित असणाऱ्या कंपनीला आरोपी बनवले आहे. आणि कंपनीच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. हे पुरवणी आरोपपत्र ( Chargesheet) आहे. मात्र यामध्ये अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्या नावाचा उल्लेख नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
“कपडे बदलतानाचा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ आईला पाठवला अन्…” गौतमी पाटील ढसाढसा रडू लागली
एवढेच नाही तर अजित पवारांनी ‘इडीला क्लीनचिट दिली की काय?’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. स्पार्कलिंग असं आरोपपत्र दाखल झालेल्या कंपनीचे नाव असून ही कंपनी अजित पवारांशी संबंधित असली तरीही, याप्रकरणी ईडीने अजित पवार यांची एकदाही चौकशी केली नाही. तसेच साधं समन्स देखील बजावल नाही. आता तर दोघांची नावे सुद्धा आरोपपत्रात नाहीत. यामुळे सगळेच थक्क झाले आहेत.
मोठी बातमी! अजित पवार भाजपात जाणार? ‘त्या’ ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण