Nana Patole | लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक बडे नेते सभा घेत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहे. नेत्यांच्या गाठीभेटी देखील वाढल्या आहेत. अनेक नेते सभांदरम्यान एकमेकांवर जहरी टीका करत आहेत. (Latest marathi news)
Amol Kolhe । अमोल कोल्हेंना मोठा धक्का, अपक्ष उमेदवारालाच मिळालं तुतारी चिन्ह
“मी कुणाच्या नादी लागत नाही. मी कोणाचं वाईट चिंतत नाही. पण माझ्यासोबत विश्वासघात केला की, त्यांचा सत्यनाश होतो, माझा इतिहास तपासा’, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं होतं. त्यावर आता काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. पण टीका करताना नाना पटोलेंची जीभ घसरली आहे.
Rally Campaign । मोठी बातमी! मुंबईचं राजकीय वातावरण पेटलं, भाजपच्या प्रचार रॅलीवर दगडफेक
“फडणवीसांना हे बोलण्याचा आधिकार नाही. ते ब्राम्हण आहेत म्हणून त्यांचा शाप आता लागत नाही. ते ओरीजनल ब्राम्हण नाहीत ते मटण खाणारे ब्राम्हण आहेत. तुम्ही २०१४ मध्ये सत्तेत येण्यासाठी जे काही बोलला होतात, धनगर आणि मराठ्यांना न्याय देऊ. कुठं केलं ते सांगा. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना हे बोलण्याचा आधिकार नाही आणि शाप देण्याचा आधिकार नाही,” असे नाना पटोले म्हणाले आहे.
Accident News । बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी