Site icon e लोकहित | Marathi News

बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर नाना पटोले यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Nana Patole reacted to Balasaheb Thorat's resignation; said…

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडून विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीच्या निकालादिवशीच बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त करतानाच राजीनामा दिल्याचीही माहिती समोर आली आहे. आता यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेससाठी धक्कदायक बातमी! बाळासाहेब थोरात यांनी दिला राजीनामा

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, आज बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस असल्याने पहिल्यांदा पटोले यांनीबाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आणि म्हणाले, बाळसाहेब थोरात यांचा राजीनामा आमच्याकडे आला नाही. त्याचबरोबर त्यांनी लिहलेली पत्रे देखील आमच्यापर्यंत आलेले नाहीत. असं नाना पटोले म्हणाले.

“आदिलमुळे माझ्या आईच निधन झालं”, राखी सावंतचा खळबळजनक खुलासा

त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, आम्ही कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या तयारीत असल्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्यासोबत आमची कोणतीच चर्चा झालेली नाही. यासंबधी फक्त बातम्या आणि अफवा सुरू आहेत. असं नाना पटोले म्हणाले आहेत.

ब्रेकिंग! राष्ट्रवादीकडून चिंचवड पोटनिवडणुकीसाठी नाना काटेंना उमेदवारी!

Spread the love
Exit mobile version