Nana Patole । मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यामध्येच मुख्यमंत्रीपदावरून तर राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळतात. सुरुवातीला भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट भाजप सोबत आल्याने हेच मुख्यमंत्रीपद अजित पवार यांना मिळणार असल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसापासून होत आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये कधी काही होईल याचा कोणी अंदाज लावू शकत नाही.
अनेकांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याची राजकीय वर्तुळा चर्चा आहे आता. यामध्येच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ येथील घृष्णेश्वर आणि खुलताबादच्या भद्रा मारुती देवस्थानात दर्शन घेतले. यावेळी त्यांना माध्यमांनी काही प्रश्न देखील विचारले. यावेळी मुख्यमंत्री पदाबाबत विचारले असता नाना पटोले यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
Uddhav Thackeray । “उद्धव ठाकरे नमकहराम माणूस”, टीका करताना भाजप आमदाराची घसरली जीभ
मुख्यमंत्री पदाबाबत विचारले असता नाना पटोले म्हणाले, “जर मी मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर ती पूर्ण होवो” असे नाना पटले म्हणाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नाना पटोले यांची मुख्यमंत्री पदाची इच्छा समोर असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात चांगल्याच रंगल्या आहेत.
आनंदाची बातमी! अवघ्या एका तासात मिटेल १२ वर्षांपूर्वीचा शेतीचा जुना वाद, ‘ही’ योजना येईल कामी
नाना पटोले यांची सरकारवर जोरदार टीका (Nana Patole)
दरम्यान, यावेळी बोलताना नाना पटोले यांनी राज्य सरकारवर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “हे बधिर आणि नालायक सरकार असून भय आणि भ्रष्टाचाराच्या बळावर हे सरकार आहे असं नाना पटोले म्हणाले आहेत.