Nana Patole । महाराष्ट्रात काँग्रेस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (यूबीटी) यांच्यात जागावाटपाची चर्चा आहे. तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. सांगली, भिवंडी आणि उत्तर मुंबई या तीन जागांवर विरोधी पक्षांची महाविकास आघाडी अडचणीत आली आहे. या जागांचे वाटप करून तिन्ही पक्षांनी जागा निश्चित केल्या आहेत.
Maharastra Politics । ब्रेकिंग! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? काँग्रेसचे दोन बडे नेते नॉटरिचेबल
सांगली लोकसभेची जागा ठाकरे गट लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र यामुळे सांगलीतील काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे दोन्ही नेते नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण सांगली जिल्ह्यात या दोन्ही युवा नेत्यांची ताकद आहे. मागच्या काही दिवसांपासून हे दोन्ही नेते सांगलीची जागा काँग्रेसनेच लढवावी यासाठी आग्रही होते. मात्र त्यांना जागा मिळाली नसल्याने हे दोन्ही नेते नाराज आहेत.
विशाल पाटील, विश्वजीत कदम दोघेही नेते नॉट रिचेबल झाले आहेत. आता यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हायकमांडच्या आदेशाच सगळे पालन करतील. लोकशाही, संविधान वाचवण्याची ही निवडणूक आहे. असं नाना पटोले म्हणाले आहे. “आज गुढीपाडव्याचा शुभदिवस आहे त्यामुळे मविआने जे निर्णय घेतले ते महाराष्ट्राच्या हिताचा घेतला आहे” असं नाना पटोले म्हणाले.
Praniti Shinde । प्रणिती शिंदे यांना सर्वात मोठा धक्का; आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल