Sharad Pawar । ठाणे : अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election) येऊन ठेपल्या आहेत. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उमेदवार देखील निवडणुकीच्या तोंडावर प्रचाराला लागले आहेत. (Loksabha election 2024) पण निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण आणखी एक मोठा नेता भाजपच्या गळाला लागला आहे. (Latest marathi news)
Ahmednagar News। हृदयद्रावक! मांजरीला वाचवण्याच्या नादात ५ जणांचा शोष खड्ड्यात बुडून मृत्यू
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी शहापूर तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे (Nand Kumar Mogre) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेशानंतर नंदकुमार मोगरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. पक्षप्रवेशावेळी भाजप तालुका अध्यक्ष भास्कर जाधव, राजेश तिवरे, अशोक इरणक, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकीकडे निवडणुकीची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे नंदकुमार मोगरे यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाला ठाण्यात सर्वात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पडलेल्या फुटीनंतर त्यांनी अजित पवार गटासोबत न जाता शरद पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Maharashtra Election 2024 । ब्रेकिंग! शरद पवार गटाची आज लोकसभेची तिसरी यादी जाहीर होणार