Nandurbar Accident । दररोज कुठे ना कुठे अपघात झाल्याचे आपल्याला ऐकायला मिळत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे राज्यात दररोज अनेक अपघात होत आहेत. यामध्ये काही अपघात चालकाचे नियंत्रण सुटल्याने तर काही अपघात वाहनांचे टायर फुटून त्याचबरोबर वन्य प्राण्यांमुळे देखील होत आहेत. सध्या देखील अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Maratha Aarakshan । ब्रेकिंग न्यूज! मराठा आंदोलनावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार
नंदुरबारच्या धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे तवेरा गाडी आणि ओमिनी कार यांच्यात समोरासमोर धडक झाली असून भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे . या अपघातामध्ये चार जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
Milind Deora । शिंदे गटातच प्रवेश का? मिलिंद देवरांची पहिली प्रतिक्रिया समोर
माहितीनुसार, धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी भीषण अपघात झाला आहे. ओमिनी कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात धडक दिल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. या अपघातामध्ये ओमिनी कार मधील चार जण जखमी असून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Manoj Jarange Patil । मनोज जरांगेंच्या मुंबईतील मोर्चाबाबत संभाजीराजेंचे सर्वात मोठे वक्तव्य!