Narayan Rane । राज्य सरकारने (Manoj Jarange Patil) नुकताच मराठा समाजाच्या सर्व मागण्या (Maratha Reservation) मान्य केल्या आहेत. याबाबत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जीआर सुपूर्द केला. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मंत्री छगन भुजबळ, खासदार सुप्रिया यांच्या पाठोपाठ आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अध्यादेशाला कडाडून विरोध केला आहे. (Latest marathi news)
Supriya Sule । “अध्यादेश काढण्यासाठी सरकारने वेळकाढूपणा केला”, सुप्रिया सुळेंचा सरकारवर घणाघात
“राज्य सरकारने मराठा समाज आरक्षणासंबंधी घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नसून यात ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार आहे. त्यामुळे राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो, यावर उद्या यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन,” असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे. (Narayan Rane on Maratha Reservation)
Chhagan Bhujbal । छगन भुजबळांचा शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले; “सरकार खोटं बोलत आहे”
दरम्यान, नारायण राणे यांनी केलेल्या विरोधानंतर छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेल्या नाराजीला बळ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. जरी मनोज जरांगे पाटील यांना रोखण्यात यश आलं असलं, तरी पुढील लढाई अटळ आहे, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आता सरकार कोणता निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Nitish Kumar Resigned । सर्वात मोठी बातमी! नितीश कुमार यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा