नारायण राणे राज्यपाल होणार? संजय राऊत म्हणाले, “आम्ही त्या नावाचं स्वागत करू”

Narayan Rane to be the governor? Sanjay Raut said, "We will welcome that name."

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्या दृष्टीने हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. अशातच राज्याचे नवीन राज्यपाल कोण असणार? याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) राज्यपाल पदी विराजमान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

मोठी बातमी! आदिल खान दुर्रानीला मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात, राखीने दाखल केली तक्रार

“नियम आणि कायद्यानुसार, एखाद्या राज्याचा नागरिक त्याच राज्याचा राज्यपाल होऊ शकत नाही. सध्या या देशात आणि राज्यात अनेक गोष्टी घटनाबाह्य होत आहेत, असं काही घटनाबाह्य कृत्य केलं असेल तर आम्ही त्या नावाचं स्वागत करू, मजा येईल!” असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

‘आय एम सॉरी…लव्ह यू मम्मी’ म्हणत बारावीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या

संजय राऊत यांना मी खासदार बनवले. मीच त्यांच्यासाठी पैसे खर्च केले असे नारायण राणे म्हणाले होते. यावरून संजय राऊत आक्रमक झाले असून त्यांनी नारायण राणे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ‘एक तर खोटे बोलल्याबद्दल जनतेची माफी मागा नाही तर कोर्टात हे वक्तव्य सिद्ध करा’, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.

चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्ये वंचितची उडी; बंडखोर राहुल कलाटे यांना आंबेडकरांचा पाठिंबा? चर्चांना उधाण

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे सतत ‘या’ ना ‘त्या’ कारणावरून शिवसेनेवर निशाणा साधत आहेत. मागील काही दिवसांपासून नारायण राणे व संजय राऊत यांच्यातील संबंध देखील ताणले गेले आहेत. दरम्यान कायदेशीर नोटीस पाठवून व त्यांच्यावर वक्तव्य करून राऊतांनी सुद्धा राणे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

ब्रेकिंग! आदिल खान गुन्हेगार? राखी सावंतने केला अत्यंत मोठा खुलासा; म्हणाली…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *