Narendra Dabholkar । डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातील UAPA खटल्यांसाठीच्या विशेष न्यायालयाने 11 वर्षांनंतर आज निकाल दिला आहे. दाभोलकर हत्या प्रकरणात न्यायालयाने तीन आरोपी निर्दोष तर दोघांना दोषी ठरवले आहे. दोषीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी वीरेंद्रसिंह तावडे याच्यावर कट रचल्याचा आरोप होता, मात्र सरकारी बाजू पुरावे सादर करू न शकल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. (Narendra Dabholkar Murder Case)
त्याचबरोबर पुनाळेकर आणि भावे यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत, त्यामुळे त्यांचीही निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. काळसकर आणि अंदुरे यांच्यावर दाभोलकर यांच्या हत्येचा आरोप सिद्ध झाला आहे, त्यामुळे दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुप्रसिद्ध विवेकवादी दाभोलकर (६७) यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी येथील ओंकारेश्वर पुलावर मॉर्निंग वॉक करत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
Ajit Pawar । अजित पवारांच्या निशाण्यावर शिरुरचे आमदार अशोक पवार
या प्रकरणात पाच जणांना आरोपी करण्यात आले होते. खटल्यादरम्यान, फिर्यादी पक्षाने 20 साक्षीदार तपासले, तर बचाव पक्षाने दोन साक्षीदार तपासले. फिर्यादी पक्षाने आपल्या अंतिम युक्तिवादात दाभोलकरांच्या अंधश्रद्धेविरोधातील मोहिमेला आरोपींचा विरोध असल्याचे म्हटले होते. पुणे पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणाचा तपास केला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने 2014 मध्ये तपास हाती घेतला आणि जून 2016 मध्ये सनातन संस्थेशी संबंधित ENT सर्जन डॉ. वीरेंद्र सिंह तावडे यांना अटक केली.