Site icon e लोकहित | Marathi News

सिन्नर- शिर्डी महामार्गावर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना नरेंद्र मोदींनी जाहीर केली मदत

Narendra Modi announced help to the relatives of the dead and injured in the accident on Sinner-Shirdi highway

अपघाताच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. सतत कुठे ना कुठे अपघात घडत आहेत. दरम्यान काल खासगी आराम बस आणि ट्रक याचा सिन्नर- शिर्डी महामार्गावर (Sinnar-Shirdi highway) पाथरे शिवारात भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १० प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. आता मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत जाहीर केली आहे.

मजुरी करणाऱ्या कुटुंबाला वीजबिलाचा आकडा पाहून बसला शॉक; घरात दोनच बल्ब पण 34 हजारचे आले बिल

याबाबत नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपये दिले जातील. तसेच जखमींना देवगिल रु. 50,000 रुपये दिले जातील. असे नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे.

“कोणतेच महापुरूष बॅचलर नाहीत”; चंद्रकांत पाटलांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खाजगी बस व ट्रकची धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आता जखमी लोकांवर रुग्णालयामध्ये (Hospital) उपचार सुरु आहे.

आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल; म्हणाले,”स्वतःला विकलं तेव्हढं पुरे, मुंबई विकू नका…”

Spread the love
Exit mobile version