
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. भाजपने (Bjp) त्यांच्या स्वागताची तयारी जोरदार केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वागत केले आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळणार ‘धनुष्यबाण’? राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण
या दौऱ्यावेळी मोदी महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) ३८ हजार ८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. दरम्यान मागच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये (Pune) दौऱ्यावर येऊन गेले असता राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता.
यापूर्वी नरेंद्र मोदी पुण्यात देहू येथे आले असून त्यांनी संत तुकाराम महाराज (Saint Tukaram Maharaj) मंदिरातील शिला मंदिराचे त्यांनी उद्घाटन देखील केले होते. त्यांच्या या दौऱ्यांनंतर मोठा राजकीय भूकंप आला होता. दरम्यान आता नरेंद्र मोदी यांच्या राजकीय भूकंप येईल का? अशा चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत.
कठीण काळात मुकेश अंबानींनी केली मोठी मदत; राखी सावंतचा मोठा खुलासा