Narendra Modi | पंडित नेहरूंच्या काळातील परंपरा नरेंद्र मोदी समोर आणणार ! संसद भवन इमारतीच्या उद्घाटनावेळी होणार लोकार्पण

pc face book

देशात लवकरच नवीन संसद भवन (New Parlliament inauguration) इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र या उद्घाटनावरून राज्यातील विरोधीपक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. देशातील १९ विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान या उद्घाटन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज माहिती दिली आहे.

Modi Government | अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारला धरले धारेवर ! उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर म्हणाले, मोदी सरकारला एवढा अहंकार…

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ मे रोजी या नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी संसद भवन उभारण्यास हातभार लावणाऱ्या ६० हजार कामगारांचा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. तसेच संसद भवन लोकार्पण सोहळ्यात एका ऐतिहासिक घटनेची पुनरावृत्ती होणार असल्याचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सांगितले.

नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने एक ऐतिहासिक परंपरा पुन्हा जिवंत केली जाणार आहे. या परंपरेला तमिळमध्ये ‘सांगोल’ असेही म्हणतात. सांगोल याचा अर्थ संपत्तीने संपन्न असा होतो. स्वतंत्र्याच्या अमृतमोहत्सवात प्रधानमंत्र्यांनी जे काही लक्ष ठरवले होते, त्यापैकी एक ऐतिहासिक परंपराचा सन्मान आणि पुर्नजागरण हे देखील होते.

Jayant Patil ED | भाजपमध्ये असणाऱ्या नेत्यांची चौकशी होत नाही ; ईडी चौकशीवरून अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका

भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ही परंपरा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वीकारली होती. सेंगोलने आपल्या इतिहासात खूप महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सेंगोल हे इंग्रजांकडून भारतीयांकडे झालेल्या सत्ता हस्तांतरणाचे प्रतिक बनले होते. पंतप्रधान मोदी यांनी या गौरवशाली परंपरेला लोकांसमोर आणण्यासाठी लोकार्पण हा दिवस निवडला आहे. अशी माहिती अमित शाह यांनी दिली.

Jayant Patil ED | भाजपमध्ये असणाऱ्या नेत्यांची चौकशी होत नाही ; ईडी चौकशीवरून अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *